धाराशिव (प्रतिनिधी)- येथील छत्रपती शिवाजी विद्यालयामध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांची बैठक दिनांक 27 ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात आली होती. 

या बैठकीत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र कार्याध्यक्ष संजय बनसोडे  कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी आयुष्यभर समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचे प्रयत्न केले. सध्या इंटरनेटच्या युगातही जनता मोठ्या प्रमाणात अंधश्रद्धेच्या आहारी जाताना दिसत आहे. तेव्हा प्रत्येक भारतीय नागरिकाने शालेय, महाविद्यालयीन, विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी आपल्या जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार केला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला पाहिजे, अनिसच्या कार्यकर्त्यांनी समाजातील समविचारी संघटनांना सोबत घेऊन अनिसच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग नोंदवून अनिसच कार्य वाढवलं पाहिजे व डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांच्या स्वप्नातील भारत साकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे सप्टेंबरमध्ये अंबाजोगाई येथे होणाऱ्या  राज्य कार्यकर्ता शिबिरामध्ये अनिस पदाधिकारी, कार्यकर्ते व समविचारी संघटनांच्या पदाधिकारी व सदस्यांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले यावेळी अनिसचे शहराध्यक्ष सिद्धेश्वर  बेलूरे , विजय गायकवाड, यांनी संजय बनसोडे,  उत्तरेश्वर बिराजदार, (राज्य सरचिटणीस महाराष्ट्र राज्य) यांचे  पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उत्तरेश्वर बिराजदार यांनी सामूहिक प्रेरणा गीत गायले यावेळी अनिस कार्यकर्ते अब्दुल लतिफ साहेब, राजेंद्र धावारे, अशोक बनसोडे, बलभीम कांबळे ,इत्यादींची उपस्थिती होती.


 
Top