उमरगा (प्रतिनिधी)- डॉ बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती यशस्वी करण्यासाठी भन्ते संघरक्षितांनी त्रिरत्न बौद्ध महासंघाच्या माध्यमातून जगभर धम्म पोंचविला आहे.डॉ बाबासाहेबानी महाबोधी पत्रिकेत भगवान बुद्ध आणि त्यांच्या धम्माचे भवितव्य हा चार हजार शब्दाचा लेख लिहिला त्याला अनुसरून जागतिक बौद्ध संघटना,आणि नव्या संघाची रचना,बौद्ध प्रशिक्षण केंद्र आदी बाबीचा विचार करून भन्तेनी नव्या धम्म सेवकांची निर्मिती केली. त्यामुळे जगातील अनेक देशात डॉ बाबासाहेब आंबेडकरांची धम्मक्रांती पोंचली आसल्याचे प्रतिपादन धम्म भूषण यांनी केले.

शहरातील बहुजन हिताय विद्यार्थी वसतिगृहात भन्ते  उर्गेन संघरक्षित यांची जयंती मोठ्या  उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी धम्मभूषण बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्ष वसतिगृहाचे चेअरमन प्रियदर्शी कांबळे होते तर भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष उमेश सुरवसे, धम्मचारी प्रज्ञाजित आदींची प्रमुख उपस्थिती होती.प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व भन्ते उर्गेन संघरक्षित यांच्या प्रतिमेचे पूजन  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. धम्ममित्र वगरसेन कांबळे, मारुती कांबळे, प्रियदर्शी कांबळे,  धम्ममित्र संघप्रिया यांच्यावतीने त्रिशरण पंचशील विधायक पंचशील बुद्धजेचे पठण केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धम्ममित्र उत्तम गायकवाड यांनी केले. सुनील कांबळे  यांनी  आभार मानले.जयंतीप्रित्यर्थ  उपजिल्हा रुग्णालय उमरगा येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात आले या प्रसंगी रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित होते.

 धम्ममित्र जी एल कांबळे, अजिंक्य कांबळे, राजेंद्र सुरवशे, मंदाताई टिळे,शांताबाई गायकवाड आदी धम्ममित्रांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

 
Top