धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव लोकसभा मतदार संघात मागील दीड महिन्यापासून पावसाने मोठा खंड दिल्यामुळे अनेक भागांतील सोयाबीन व खरीपाची अन्य़ पिके पाण्याअभावी वाळून गेली आहेत. ऐन पीक वाढीच्या महत्त्वाच्या काळात पावसाने दडी मारल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले असून, शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली आहे.

यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र राज्य; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्रीदत्तात्रय भरणे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव यांना पत्र देऊन नुकसानग्रस्त सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी. तसेच पावसाच्या दीर्घ खंडामुळे पिकांची झालेली सद्यस्थिती लक्षात घेऊन महसूल व कृषी विभागामार्फत तातडीने प्रत्यक्ष पाहणी, पंचनामे व नुकसानीचे सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी खासदार राजेनिंबाळकर यांनी केली आहे.

 
Top