धाराशिव (प्रतिनिधी)- वैद्यकीय ज्ञान व सेवाभावी कार्यातून अनेकांच्या जीवनात आनंद फुलविणारे होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ. अमोल गावडे यांना लोकशाही वृत्तवाहिनीतर्फे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. छत्रपती संभाजीनगर येथील मंगलम रिसॉर्टमध्ये आयोजित पुरस्कार वितरण सोहळ्यात इतर मागास बहुजन कल्याण व दुग्धविकास मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते डॉ. गावडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी लोकशाही वृत्तवाहिनीचे मॅनेजिंग एडिटर विशाल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. गावडे यांनी सपत्नीक पुरस्कार स्वीकारला.

वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल बेंबळीवासीयांच्या वतीनेही त्यांचा सत्कार करण्यात आला.  डॉ. गावडे यांच्या सन्मानामुळे बेंबळी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

 
Top