धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तसेच महिला मोर्चा यांच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ध्वजवंदन व राष्ट्रीय गीत चालू असताना राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय गीताचा सन्मान न ठेवता ज्या पद्धतीने त्या वागल्या त्याबद्दल तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
भारत देश हा जगातील एकमेव देश आहे जो आपल्या राष्ट्राला मातेचा दर्जा देतो व या मातेच्या सन्मानार्थ वंदे मातरम या संपूर्ण गीताचे गायन करावे असा आपल्या शासनाने नियम केलेला असताना एका परदेशी महिलेला भारताचे नागरिकत्व देऊन त्यांना आपल्या देशामध्ये सामावून घेण्याच्या या उदार अंतकरणाचा त्यांनी अपमान केलेला आहे. जरी भारत देशाने त्यांना सामावून घेतले असेल तरी त्यांनी ह्या देशाच्या राष्ट्रीयत्वाला आपल्या मनामध्ये जागा दिलेली नाही असेच यामधून दिसून येते. त्या ठिकाणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे त्याचबरोबर खासदार राहुल गांधी हेही उपस्थित होते. परंतु त्यांना या जाज्वल्य राष्ट्रप्रेम जागरूक करणाऱ्या गीताला सन्मान देणे महत्त्वाचे वाटले नाही हे अत्यंत निंदनीय आहे. राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष त्याचबरोबर राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांनी सबंध देशवासीयांची माफी मागितली पाहिजे.
