भूम (प्रतिनिधी)-  येथील शंकरराव पाटील कनिष्ठ (स्वतंत्र) महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धन, महाविद्यालय परिसरात हरित वातावरण निर्माण करणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या वृक्षारोपण कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य संतोष शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. काळे जी. सी., महाविद्यालयातील प्राध्यापकवृंद तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य व उपस्थित मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी महाविद्यालय परिसरात विविध प्रकारच्या रोपांची लागवड केली. वृक्षारोपण करताना विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर वृक्षांचे महत्त्व, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षांची भूमिका आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाई जपण्याची गरज याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात आली.

केवळ वृक्षारोपण करून थांबायचे नाही, तर लागवड केलेल्या रोपांचे नियमित संगोपन व संवर्धन करण्याचा संकल्पही यावेळी विद्यार्थ्यांनी केला. रोपांना वेळोवेळी पाणी देणे, त्यांची निगा राखणे आणि त्यांची वाढ होण्यासाठी आवश्यक काळजी घेण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारली. महाविद्यालय परिसर अधिक हिरवागार व स्वच्छ ठेवण्यासाठी भविष्यातही अशा विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.


 
Top