भूम (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शाखा भूमच्या वतीने संघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये 55 रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सहा वर्षापासून संघाचे मार्गदर्शक सोमनाथ टकले यांच्या संकल्पनेतून भूम येथे तालुका संघाच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात येते. प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षी देखील रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले विशेष बाब म्हणजे या शिबिरामध्ये महिलांचा प्रतिसाद उत्स्फूर्त असा दिसून आला. सदर रक्तदान शिबिराच्या उद्घाटनासाठी भूमचे डी वाय एस पी चोरमले, थ्री एस अकॅडमीचे संचालक देवकर, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संतोष देशपांडे, राज्यचिटणीस भक्तराज दिवाने यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चुंबळी शाळेचे मुख्याध्यापक मुळे यांनी मुलगा, मुलगी, पत्नी यांचे सह सर्वांनी एकाच वेळी रक्तदान करून एक मोठे राष्ट्रीय कार्य पार पाडले आहे त्याबद्दल मुळे कुटुंबीयांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजीवन तांबे, अर्जुन गुंजाळ,सरचिटणीस दत्तात्रय गुंजाळ कार्याध्यक्ष दीपक वाळके कोषाध्यक्ष दत्तात्रय घुले महिला आघाडी अध्यक्षा लक्ष्मी इंगळे गुंजाळ स्मिता जंजिरे अर्चना नरके खोसे, जयश्री गायकवाड, वंदना इंगळे, शोभा काशीद, अनुराधा बाशिंगे, तात्या ढोरे, सुनील गुंजाळ, अण्णा मोटे, अंगद मिसाळ, काका डोरले, मनोहर गजरे, रामभाऊ शिंदे, शहाजी पंडित, श्रीराम हंगे, मंगल कुटे, समीना बागवान, रणजीत तावरे, तेजस्विनी खंबाट, राजूभाई गोपाळ घुले, रवी भोंग, अशोक नलावडे, शिवाजी भराटे,सुभाष शिंदे यांनी प्रयत्न केले.

 
Top