धाराशिव (प्रतिनिधी)- आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन प्राथमिक विद्यामंदिर धाराशिव येथील 18 विद्यार्थ्यांना इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्तीधारक परीक्षेमध्ये यश मिळाले आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एकाच शाळेचे एवढे मोठ्या संख्येने विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक होण्याचा मान नूतन प्राथमिक विद्यामंदिर यांना मिळाला आहे. 

शिष्यवृत्तीधारक यादीमध्ये राऊत राजवीर रघुनाथ (252 गुण);धोंगडे विराज विकास ( 252 गुण ), भातभागे आरव अशोक (246 गुण);डोलारे अन्विता मनोज (242 गुण); कापसे सावी विवेक (240 गुण);लोमटे अनुजा अमितकुमार (230 गुण); मुळे वेदिका कृष्णकांत (228गुण); खूने शिवराज विकास (226 गुण); शेळके श्रेया सचिन (224 गुण);पडवळ मल्हार अशोक (216 गुण); लष्करे मेधावी विनोद (214 गुण); खाडे विघ्नेश विकास ( 214 गुण); माने रुद्र किशोर (206 गुण); फिसरेकर मृणाल प्रसाद (202 गुण); लोहार सिद्धी संतोष (202गुण); घोलकर शरयू ज्योतीराम (200 गुण); बोचरे वेदांत संजय (200 गुण);वाघ संजोग अभिमन्यू (198 गुण);वागदकर ऋतुराज रमेश (198 गुण) मिळवले असून या सर्व विद्यार्थ्यांना मार्गदर्शक म्हणून वागदकर, उषा मिसाळ, शीतल देशमुख, दिपाली कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. 

या विद्यार्थ्यांचा सत्काराच्या  कार्यक्रमाच्या प्रसंगी आवर्जून संस्था अध्यक्ष आदरणीय सुधीर अण्णा पाटील, संस्था सरचिटणीस  प्रेमाताई सुधीर पाटील, गटशिक्षणाधिकारी जयमाला शिंदे, शिक्षण विस्तार अधिकारी देवशाला हाके, पालक प्रतिनिधी म्हणून पुनम सुहास पवार आणि ज्योती सुनील निकम,शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप गोरे, गुरुवर्य के.टी. पाटील फॉऊडेशन प्रमुख शरद क्षिरसागर श्रीपतराव भोसले हायस्कूल इ. 5 वी  पर्यवेक्षक शेषनाथ वाघ नुतन विद्यामंदिर पर्यवेक्षक संजय जाधव, सहशिक्षक  राम मुंडे, गोपाळ पोळ, रामराजे पाटील, रमेश वागतकर,रविकुमार मुळे, नितीन देशमुख, श्रीमती मनीषा इंगळे, चित्रा सोनटक्के, शीतल उटगे, संध्या वाघ, शिवकन्या बिराजदार, कांचन बटवे आदिसह शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

 
Top