धाराशिव (प्रतिनिधी)-  येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये इयत्ता 5 वी ते 7 वी इयत्तेतील विद्यार्थ्यांना प्रशालेच्या विद्यार्थी कल्याण मंडळ व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने गणवेश वाटपासोबत शालेय दप्तर, वह्यांचे वितरण करण्यात आले. तसेच स्कॉलरशिपमध्ये यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कारही करण्यात आला.

या वेळी संस्थेच्या सरचिटणीस  प्रेमाताई सुधीर पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. प्रथम मान्यवरांचा हस्ते विद्यार्थी कल्याण मंडळासाठी प्रत्येक वर्षी करत असलेल्या भरीव व कौतुकास्पद कामगिरीबद्दल संगिता शिंदे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.  या वेळी संस्था सरचिटणीस प्रेमाताई पाटील,प्राचार्य नंदकुमार नन्नवरे उप मुख्याध्यापक प्रमोद कदम,पर्यवेक्षक  बी. एम. गोरे, एस.डी.वाघ,  आर. बी. जाधव, के.जी.निकम, बी. बी. गुंड  उपस्थित होते.  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एस. एम. शिंदे तसेच एच एस. ठेले, सुरज सपाटे, ए.व्ही. शेंडगे, दिपक केंगार, विश्वास शेवाळे, धम्मपाल ओव्हाळ यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन दिपक केंगार यांनी केले. तर आभार उपमुख्याध्यापक प्रमोद कदम यांनी मानले.


 
Top