तुळजापूर (प्रतिनिधी)- श्रीक्षेत्र तुळजापूर येथील महाद्वाराजवळील खडकेकाळ गल्ली येथे श्रावणमासानिमित्त बुधवार, दि. 19 ते बुधवार, दि. 26 ऑगस्ट 2026 या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, शिवलीलामृत पारायण आणि श्रीमद् देवी भागवत कथा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. यंदा या धार्मिक उपक्रमाचे बारावे तपपूर्ती वर्ष साजरे होत असून, भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या आध्यात्मिक सोहळ्यास महंत तुकोजी बुवा, महंत मावजीनाथ, महंत दत्तारण्य महाराज, महंत सोमवारगिरी इच्छागिरी महाराज, महंत चिलोजी बुवा आणि महंत वाकोजी बुवा यांचे शुभाशीर्वाद लाभणार आहेत.
विविध पूजनांनी होणार शुभारंभ
बुधवार, दि. 19 ऑगस्ट रोजी सकाळी विणा पूजन, पेटी पूजन, मृदंग पूजन, ध्वज पूजन, कलश पूजन, ग्रंथ पूजन, टाळ पूजन, गाथा पूजन, तुळशी पूजन आणि गोमाता पूजन अशा विविध धार्मिक विधींनी सोहळ्याची सुरुवात होणार आहे. त्यानंतर दररोज काकडा आरती, ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन, हरिपाठ, महिला भजन आणि विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
नामवंत कीर्तनकारांचा आध्यात्मिक मेळावा
सप्ताहादरम्यान राज्यातील नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार भाविकांना मार्गदर्शन करणार आहेत. दि. 19 ऑगस्ट ह.भ.प. संतोष महाराज पायगुडे (पुणे ), दि. 20 ऑगस्ट विनोदाचार्य ह.भ.प. शिवा महाराज बावसकर (शेगाव), दि. 21 ऑगस्ट ह.भ.प. साध्वी वैष्णवी सरस्वती दिदी महाराज (आळंदी), दि. 22 ऑगस्ट विनोदाचार्य ह.भ.प. पद्माकर महाराज देशमुख (अमरावती), दि. 23 ऑगस्ट समाजप्रबोधनकार ह.भ.प. माऊली महाराज पटाडे (कर्जत), दि. 24 ऑगस्ट ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील (बुलढाणा), दि. 25 ऑगस्ट ह.भ.प. उमेश महाराज दशरथे (आळंदी), झी टॉकीज फेम पांडुरंग महाराज रेड्डी यांचे काल्याचे कीर्तन, दि. 26 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत झी टॉकीज फेम ह.भ.प. पांडुरंग महाराज रेड्डी (तुळजापूर) यांचे काल्याचे कीर्तन होणार असून, त्यानंतर श्री. सुनिल (पिंटू) रोचकरी यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याच्या व्यासपीठाधिकारी ह.भ.प. उज्वला अजित क्षीरसागर असणार आहेत. रणसम्राट कबड्डी संघ, खडकेकाळ गल्ली, महाद्वार चौक, तुळजापूर यांच्या वतीने आयोजित या भव्य धार्मिक सोहळ्याचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.