भूम (प्रतिनिधी)-  लोकशाहीर साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त भूम शहरात उत्साहपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे याही वर्ष जयंती उत्सवात समाजातील मोलमजूरी आपला उदरनिर्वाह करणारे 76 वर्षीय रामलिंग साठे यांना ध्वजारोहणाचा मान देऊन समाजाच्या कृतज्ञतेचा संदेश देण्यात आला. 

ध्वजारोहणानंतर रामलिंग साठे यांचा पुष्पहार, देऊन सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात त्यांच्या कष्टमय जीवनप्रवासाला सलाम केला. मातंग समाजाच्या वतीने साठेनगर येथील समाज मंदिरासमोर जयंती समिती अध्यक्ष प्रदीप साठे यांच्या नेतृत्वात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या समवेत गणेश साठे, नितीन साठे, सचिन साठे, शैलेश साठे, निलेश साठे,विनोद साठे, आकाश साठे, सुजीत साठे, विशाल शिंदे, जितू शिंदे, प्रशांत साठे, हरी लोंढे, गिरीश साठे यांनी कार्यक्रमाचे संयोजन सांभाळले. कार्यक्रमात माजी नगराध्यक्ष विजयसिंह थोरात, भाजपाचे राज्य परिषद सदस्य बाळासाहेब क्षिरसागर, उपनगराध्यक्ष सौ लक्ष्मी साठे , तालुका अध्यक्ष संतोष सुपेकर, शहराध्यक्ष बाबासाहेब वीर,  माजी सैनिक संघटना अध्यक्ष हेमंत देशमुख, प्रसिद्धी प्रमुख शंकर खामकर, काँग्रेस आय तालुकाध्यक्ष सिराज मोगल, जिल्हा उपाध्यक्ष विलास शाळू, शिवसेना ज्येष्ठ नेते दिलीप शाळू महाराज, तालुका प्रमुख नगरसेवक  अनिल शेंडगे,  नगरसेवक चंद्रमणी गायकवाड, नगरसेवक नवनाथ रोकडे, नगरसेवक विठ्ठल बागडे, नगरसेविका सुरेखा काळे, गौरीशंकर साठे, दत्ता काळे, अरुण महाराज काळे, विजय शिंदे,  यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top