धाराशिव (प्रतिनिधी)-  लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत अभिवादन केले. दरम्यान, आमदार पाटील यांच्या हस्ते उपस्थितांना पेढे वाटप करून जल्लोषात दि.1 ऑगस्ट रोजी जयंती साजरी करण्यात आली.

धाराशिव शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास आ पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक विलास लोंढे व सामाजिक कार्यकर्ते दत्ता पेठे यांच्यावतीने भारतीय संविधानाची प्रत, शाल, फेटा व पुष्पहार देऊन आ पाटील यांचा सन्मान करण्यात आला. फटाक्यांची आतषबाजी व अण्णाभाऊ साठे यांच्या घोषणा देत जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी, नगरध्यक्षा नेहाताई काकडे, उपनगराध्यक्ष अक्षय ढोबळे, सभापती वैशाली सोनवणे, नगरसेवक राजकन्या आडसुळ, वंदना पवार, राहुल काकडे अमोल राजे, सिध्दार्थ बनसोडे, आकाश तावडे, अक्षय जोगदंड, दाजीप्पा पवार, विलास लोढे यांच्यासह धनंजय पाटील, बापू पवार, दत्ता पेठे, मारुती लोढे,  सुमेध क्षिरसागर, खडु चांदणे, संतोष पेठे, सोमनाथ पेठे, महेश देडे आदींसह पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top