धाराशिव (प्रतिनिधी)- पंजाबराव देशमुख यांनी परिस्थिती नसतानाही केवळ शिक्षण घेण्यासाठी ते पुणे येथील फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकले नंतर त्यांनी आपले शिक्षण परदेशात जाऊन ऑक्सफर्ड विद्यापीठातूनही घेतले आणि आपल्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र घडविण्यासाठी केला. ॲड. पंजाबराव देशमुख यांना केवळ विदर्भापुरते मर्यादित न ठेवता त्यांचे कार्य देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचे आहे. त्यांचे कार्य आजही समजून घेणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन प्रमुख व्याख्याते प्रा.डॉॅ.वसंतराव चव्हाण( भाषा साहित्य आणि संस्कृती अभ्यास शाळा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांनी 17 आगस्ट रोजी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव व श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रबोधनपर व्याख्यानाप्रसंगी केले आहे. 

अध्यक्षस्थानी मा.प्राचार्य डॉ.अंबादास मंजुळकर  रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव हे होते. यावेळी जे डी पाटील सांगळूदकर महाविद्यालय,दर्यापूर जि.अमरावती चे प्राचार्य मा.डॉ.अतुल के.बोडखे,मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ. भिल्ल पवार  हे उपस्थित होते.

प्रारभी प्रमुख मान्यवरांनी शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे,ॲड.पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमांचे पूजन केले  कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांचे  स्वागत करण्यात आले. यावेळी श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती यांचे वतीने कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.अंबादास मंजुळकर यांचे ॲड.पंजाबराव देशमुख यांचेवरील गौरवग्रंथ व  तैलचिञ देऊन सत्कार करण्यात आला.

पुढे बोलताना डॉ.दिलीप चव्हाण म्हणाले की,रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था ,कोल्हापूरचे  संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांनी बहुजनांचा विकास करण्यासाठी शैक्षणिक प्रसारासाठी कार्य केले तसेच ॲड.पंजाबराव देशमुख यांनी विदर्भात शैक्षणिक प्रचार व प्रसार श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावतीच्या माध्यामातून केले आहे विदर्भामध्ये संत गाडगेबाबा ,संत तुकडोजी महाराज,ॲड .पंजाबराव देशमुख जन्मले आणि त्यांनी महाराट्र घडविला त्यामुळे आजच्या विद्यार्थ्यांनी ,शिक्षकांनी ॲड.पंजाबराव देशमुख यांचे उत्तुंग असणारे कार्य  संपूर्ण महाराष्ट्र घडविणारे कार्य समजून घेण्याचे आवाहान केले आहे.

अध्यक्षीय समारोप करताना रामकृष्ण परमहंस महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.अंबादास मंजुळकर म्हणाले की, आपल्या व्याख्यानातून प्रा.डॉ.दिलीप चव्हाण यांनी संपूर्ण महाराषट्राला दिशा देणारे ॲड.पंजाबराव देशमुख यांचे कार्य संदर्भासहित सांगीतले आहे आणि ते वास्तविक आहे त्यामुळे आपल्याला पुढे जाण्यासाठी आजही ॲड.पंजाबराव देशमुख यांचे कार्य प्रेरणादायी आहे त्यांचे विचार आत्मसात करूया व त्यांचे विचार ,त्यांचे जिवन व कार्य समजून घ्यावे असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक मा.प्राचार्य डॉ.अतुल बोडखे यांनी केले

कार्यक्रमाचे सूञसंचालन  व आयोजन राज्यशास्ञ विभागाचे प्रमुख प्रा.डॉ.डी.वाय.साखरे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रा.राजेश भुरंगे यांनी मानले.यावेळी रामकृष्ण परमहंस महाविद्यालयातील कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी,गुरूदेव कार्यकर्ते,शिक्षकेत्तर कर्मचारी व सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top