भुम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील माणकेश्वर येथे रविवार दि. 10 ऑगस्टच्या मध्यरात्री चोरट्यांनी धुडगूस घातला. चोरट्यांनी एकाच रात्री आठ घरांची कडी-कोंडी तोडून चोरी केल्याची घटना घडली आहे. यामध्ये विश्वनाथ राऊत यांचे पाच ते सहा तोळे सोण्याचे दागिने व रोख रक्कम चार लाख तीस हजार,
विष्णू राजाभाऊ देवकते यांचे शेळ्या विकलेल्या व धान्य विकूण आलेले आसे तीन लाख पन्नास हजार रोख रक्कम, सचीन दनाने यांचे दोन आयफोन असा ऐेवज चोरट्यांनी लंपास केला. इतर घरांचे कुलूप तोडूण घरात प्रवेश केला व घरातील वस्तू विस्कटलेल्या आवस्थेत आढळूण आले. यामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माणकेश्वर- भांडगाव रस्त्यावरील परिसरात हा चोरीचा प्रकार घडला आहे. विश्वनाथ वसंत राऊत, सचिन मुकुंद दणाने, विष्णू राजाभाऊ देवकते, विलास केरबा देवकते, भाऊसाहेब शिवाजी पाटील, निजाम अहमद शेख, अंकुश महादेव अंधारे, दत्तात्रय गादेकर या आठ जनांची घरे फोडून चोरी केली आहे. चोरट्यांनी ज्या घरांना बाहेरून कुलूप होते अशा घरांना लक्ष्य केले. घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोकड आणि महागडे मोबाईल असा ऐवज लंपास केला आहे.
भयंकर बाब म्हणजे चोरी झालेल्या घरांच्या शेजारील घरांच्या बाहेरून कड्या लावून चोरटे पसार झाले. त्यामुळे हा प्रकार सोमवारी सकाळी उघडकीस आला.
घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने परांडा पोलीस स्टेशनला माहिती दिली. पोलीसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच श्वान पथक आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. पुढील तपास परांडा पोलीस करत आहे. माणकेश्वर सह परिसरातील गावक-यात भीतीचे वातावरण असल्याने रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे. घटना स्थळला परांडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक आसाराम चोरमले, सहय्यक पोलीस निरिक्षक पी. एस. सिरसट यांनी ठसे तज्ञ व श्वान पथक यांच्या सह भेट दिली.

