धाराशिव (प्रतिनिधी)- सर्व्हिस रोड संपताच 5 ते 6 फूट खोल खड्डा त्यावरती स्लॅब न टाकता तसाच उघडा ठेवण्यात आलं आहे. जेणे करून अपघात होऊन मोठी दुर्घटना होऊ शकते. मागच्या दीड वर्षांपूर्वी पोदार शाळेतील एका मुलाचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर नागरिकांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. परत तशीच पूर्णवृत्ती होण्याची दाट शक्यता आहे. या या माझ्याकडे या खड्ड्यात पडायला, मला अजून एक बळी पाहिजे त्याशिवाय माझे समाधान होणार नाही. अशा आशयाचे होर्डिंग याठिकाणी नागरिकांच्या वतीने लावण्यात आले आहेत. जर हा रस्ता 15 दिवसात नाही दुरुस्त केला तर जेसीबीच्या साहाय्याने सर्व्हिस रोड फोडण्यात येईल. असा इशारा नागरिकांनी दिला आहे.
