तुळजापूर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी नेत्रालयाच्या वतीने 40 वर्षांवरील नागरिकांसाठी भव्य मोफत नेत्र तपासणी शिबिराचे15 ऑगस्ट 2026 ते 20 सप्टेंबर 2026 या कालावधीत डी.सी.सी. बँकेसमोर, नळदुर्ग रोड, तुळजापूर, येथे आयोजित करण्यात आले आहे.
मारुती स्कायर्लाइन मल्टीपर्पज सोशल फाउंडेशन, धोत्री यांच्या सहकार्याने तसेच तुळजापूरकरांच्या विश्वासाला पात्र ठरलेल्या श्री तुळजाभवानी नेत्रालयात हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शिबिरामध्ये अनुभवी तज्ज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची सर्वंकष नेत्र तपासणी केली जाणार आहे. मोफत रेटिना तपासणी व मोफत इंजेक्शन देण्याची सुविधा शिबिरात उपलब्ध असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. अल्पदरात फेको मशीनद्वारे विना टाका, विना भूल, विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची सुविधाही उपलब्ध असल्याचे प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे. त्याचबरोबर एका चष्म्यावर दुसरा चष्मा मोफत देण्याची सुविधाही जाहीर करण्यात आली आहे.रक्त तपासणी वर विशेष सवलत, अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया, फेको पद्धतीने मोतीबिंदू शस्त्रक्रिया. शिबिरात डॉ. गीतांजली कुंडलिक माने-थोरात, डॉ. श्रीकांत पांडुरंग थोरात आणि डॉ. जयश्री किरण थोरात-पाटील हे तज्ज्ञ नेत्ररोग डॉक्टर मार्गदर्शन व तपासणी करणार आहेत. तरी या मोफत शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सुप्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ गीतांजली माने यांनी केले.
