उमरगा (प्रतिनिधी)- सखल मातंग समाज, उमरगा तालुक्याच्या वतीने आज दिनांक 1 ऑगस्ट 2026 रोजी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंतीनिमित्त “साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे चौक, उमरगा“ येथे भव्य ध्वजारोहण व जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात ध्वजारोहण व प्रतिमा पूजनाने झाली. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून उमरगा-लोहारा तालुक्याचे आमदार प्रवीण स्वामी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती जितेंद्र दादा शिंदे, उमरगा नगरीचे नगराध्यक्ष किरण गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. सुरेश बिराजदार, उमरगा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी, उमरगा नगरीचे उपनगराध्यक्ष विजय वाघमारे, दिलीपराव भालेराव, उमरगा काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नानाभाऊ भोसले, काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अर्जुन बिराजदार, नगरसेवक सचिन जाधव, नगरसेवक रत्नाकांत सगर, बाबा मस्के, नगरसेवक मुस्तफा चौधरी, नगरसेवक शरद पवार, नगरसेवक राहुल शिंदे, काँग्रेसचे युवक जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड, धाराशिव काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अँड. एस पी इनामदार उपस्थित होते.

जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीप गायकवाड व जयंती कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ शिंदे यांच्यासह शिवाजी भाऊ गायकवाड, संजय कांबळे, विजय तोडकर, राम कांबळे, राम कांबळे मळगी, सुधाकर बनसोडे, पांडुरंग शिंदे, यादव शिंदे, नागेश कांबळे, बळी मोरे, विशाल गायकवाड, बालाजी साने, किरण क्षीरसागर, छायाबाई नाईकवाडे, वर्षाताई कांबळे, गोजर बनसोडे, गण्या कांबळे, भाग्यश्री सूर्यवंशी, अल्का कांबळे, जोगेश्वरी शिंदे, मनीषा तोरडकर, सावित्रा गायकवाड, अरुणाताई एडके, आशा शिंदे, मारुती नरसिंगे बालाजी कांबळे, आकाश गायकवाड, विष्णुपंत खंडागळे, पिंटू एडके, नितीन शिंदे, प्रभाकर कांबळे, सचिन शिंदे, दयानंद गायकवाड, संभाजी, सुजित गायकवाड, मंगेश सुरवसे, सुमित शिंदे (प्रतीक्ष, खुरेशी प्रवीण भालेराव या छोट्या चिमुकल्यांनी आपली भाषणे सादर करून उपस्थितांची मने जिंकली.) यावेळी समाजाच्या वतीने शिवाजी भाऊ गायकवाड संजय सरवदे वर्षा कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले व दिलीप गायकवाड यांनी अध्यक्ष समारोप केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी गायकवाडयांनी केले. तर सूत्रसंचालन व आभार अँड. सुखदेव होळीकर यांनी मानले.

या कार्यक्रमादरम्यान सखल मातंग समाजाच्या वतीने आमदार प्रवीण स्वामी व नगराध्यक्ष किरण गायकवाड यांच्याकडे महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या.  

गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नगरपालिकेने तात्काळ बसवावा. उमरगा शहरामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने भव्य सभागृह उभारण्यात यावे. भविष्यात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा व लोकसभा यामध्ये मातंग समाजाला संधी देण्यात यावी. यावेळी आमदार व नगराध्यक्ष यांनी समाजाला आश्वासन दिले की, “येणाऱ्या पुढील जयंतीपर्यंत अण्णाभाऊ साठे यांचा सभागृह व पुतळ्याच्या संदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करून तो पूर्ण करण्याचा प्रयत्न करू.“ या जयंती कार्यक्रमाला उमरगा तालुक्यातील सखल मातंग समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि उत्साहात पार पडला.

 
Top