परंडा (प्रतिनिधी)- परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयातील विवाह नोंदणी विभागाकडून विवाह नोंदणी केलेल्या चे प्रमाणपत्र मिळत आहे पण त्या प्रमाणपत्रावर बारकोड नसलेल्याचे मिळत आहे व ते मिळालेले प्रमाणपत्र आधारकार्ड दुरुस्ती साठी चालत नसलेल्यामुळे आज विवाह होऊन आलेल्या नववधुच्या आधारकार्डच्या नांवाची दुरुस्ती करता येत नसल्याने त्यांना शासनाकडून मिळणाऱ्या योजने पासून वचिंत राहावे लागते. अनेक वधु ना नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता आला नाही. अशा अनेक अडचणीना तोंड द्यावे लागत आहे. शहरातील विवाह नोंदणी केलेल्या शहरातील नववधु यांना आपल्या आधारकार्ड वरील नांवाची दुरुस्ती करता आली नाही. तेव्हा विवाह नोंदणी केल्यावर ऑनलाइन प्रमाणप्रत्र देण्यात यावे अशी मागणी पत्रकार श्रीराम विद्वत यांनी जिल्हाधिकारी धारशिव याच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे
परंडा शहरात विवाह झालेले वधुवर शासनाच्या नियमानुसार विवाह नोंदणी करण्यासाठी विवाह निबंधक यांच्या कार्यालयात जाऊन विवाह नोंदणी करतात पण शासनाच्या नियमानुसार बारकोड नसलेले प्रमाणपत्र देण्यात येते पण त्या प्रमाणापत्र आधारे आधारकार्ड वरील नांव बदलणे होत नसल्याने नववधुना अनेक अडचणी येत आहेत परंडा तालुक्यातील ग्रामीण भागात विवाह नोंदणी केली तर बारकोड सह प्रमाणापत्र मिळते परंडा शहरातील नव वधु ना मिळत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांतुन नाराजी व्यक्त केली जात आहे तेव्हा वरिष्ठ अधिकारी यांनी या कडे त्वरित लक्ष देवुन बारकोड असलेले प्रमाणापत्र देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे.