धाराशिव (प्रतिनिधी)-  संपर्क, सहयोग,  संस्कार सेवा आणि समर्पण या पंचसूत्रीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात शैक्षणिक,  सामाजिक,  पर्यावरण आरोग्य व इतर अनेक सामाजिक क्षेत्रामध्ये सेवाभावाने कार्यरत असणाऱ्या भारत विकास परिषदेच्या  स्थापना दिनानिमित्त जिल्हा परिषद प्रशाला वडगाव सिद्धेश्वर येथील शाळेतील इयत्ता पहिली ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना टिफिन बॅगचे वाटप करण्यात आले. 

यावेळी भारत विकास परिषदेच्या धाराशिव शाखेचे अध्यक्ष डाँक्टर सचिन रामढवे, सचिव सुहास हिंदाणे ,उपाध्यक्ष प्रशांत कावरे , उपाध्यक्ष सिद्धार्थ विठ्ठलदास,  प्रांत संपर्क प्रमुख नरेंद्र पाठक,  संपर्कप्रमुख डॉक्टर दिपाली रामढवे ,  पर्यावरण प्रमुख तृप्ती कठारे, सदस्य मिताली विठ्ठलदास , श्वेता जेवळीकर आदिसह  प्रशालेच्या मुख्याध्यापिका ज्योती राऊत उपस्थित होत्या. यावेळी अध्यक्ष डाँक्टर  सचिन रामढवे यांनी भारत विकास परिषदेच्या देशव्यापी  कार्याची माहिती दिली व विद्यार्थ्यांमध्ये देशाविषयी माहिती निर्माण व्हावी त्यांना ज्ञान मिळावे यासाठी " भारत की खोज " ही प्रतियोगिता स्पर्धा परीक्षा परिषदेमार्फत घेतली जात असल्याचे सांगितले व  भारत विकास परिषदेचे संपूर्ण देशभरात मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स , जेनेरिक मेडिसिन ,दिव्यांगासाठी कृत्रिम अवयव निर्मिती व प्रत्यारोपण , पर्यावरण संवर्धन आदि विविध सामाजिक क्षेत्रामध्ये देशव्यापी कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी  प्रशालेच्या मुख्याध्यापिका ज्योती राऊत यांनी भारत विकास परिषदेचे शाळेतील विद्यार्थ्यांना मदत करण्याचे काम अत्यंत स्तुत्य असल्याचे सांगितले.  या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सहशिक्षक भालचंद्र कोकाटे यांनी केले. यावेळी शाळेतील  सहशिक्षक भास्कर खडबडे, सुधीर गायकवाड, सहशिक्षिका सुचिता शेलार ,  रेखा डाके , निर्मला गुरव, आरती करपे , माधुरी पौळ ,भूषण मदने आदीसह शाळेतील सर्व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top