धाराशिव (प्रतिनिधी)- शहरातील श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये जि.प. धाराशिव चे शिक्षणाधिकारी प्रत्यक्ष प्रशालेस भेट देऊन शासकीय योजनांची माहिती दिली त्यादरम्यान प्रशालेच्यावतीने प्राचार्य तथा मुख्याध्यापक नंदकुमार नन्नवरे यांच्या हस्ते शाल,स्मृतिचिन्ह ,पुष्प गुच्छ, गुरुवर्य के.टी. पाटील सरांचे चरित्र पुस्तक शिष्यमेरु देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रभारी विस्तार अधिकारी निलेश नागले, संस्था सदस्य महेश शिंदे, इ.8 वीचे पर्यवेक्षक कुमार निकम, इ. 5 वीचे पर्यवेक्षक शेषनाथ वाघ, लिपीक गणपत उपासे , सेवक बापू आदमाने उपस्थित होते.
