परंडा (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्ह्यातील सीना नदी ही जिल्ह्याच्या जीवनदायिनी आहे. उजनी धरणातील पाणी सीना - माढा बोगद्याद्वारे परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांना व नागरिकांना मिळते. सध्या उजनी धरणात 50% प्लस पाणीसाठा उपलब्ध असतानाही सीना - माढा बोगद्यातून पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे खालील गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत.
परंडा तालुक्यासह धाराशिव जिल्ह्यातील व सोलापूर जिल्ह्यातील रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी वाळून चालली आहेत. अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तरी जलसंपदा मंत्री यांनी या प्रकरणात लक्ष घालून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी उजनी धरणातून सीना - माढा बोगद्यातून तात्काळ पाणी सोडण्याचे आदेश संबंधित विभागाला द्यावेत असे लेखी निवेदन माजी आमदार तसेच 243 परंडा मतदारसंघामध्ये ज्यांनी शाश्वत सिंचनाची व विजेची विकासकामे केली असे हरित क्रांतीचे प्रणेते, लोकनेते माजी आमदार राहुल मोटे यांनी दिले आहे.