तेर (प्रतिनिधी)- शेगावच्या श्री गजानन महाराज व श्री संत गोरोबा काका यांच्या भेटीचा सोहळा पाहण्यासाठी भाविकभक्त यांनी प्रचंड गर्दी केली होती.14जुलैला तेर येथे श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे सकाळी आगमन झाले. पालखीचे आगमन होताच तेर व परीसरातील भाविकभक्त यांनी दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती.
श्री गजानन महाराज यांच्या पालखीचे श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरासमोर आगमन होताच श्री गजानन महाराज व श्री संत गोरोबा काका यांची भेट सोहळा अत्यंत आनंददायी क्षण मनामध्ये साठविण्यासाठी उपस्थित भाविकभक्त आतूर झाले होते. हा क्षण पहाण्यासाठी भाविकभक्त यांची उत्कंठा मनामध्ये शिगेला पोहंचली होती. पालखीचे स्वागत श्री संत गोरोबा काका व शिवमंदिर ट्रस्टचे प्रशासक राजेंद्र कानडे यांनी केले.
संत सेना महाराज नाभिक महामंडळ तेर यांच्या वतीने श्री गजानन महाराज यांच्या पालखीतील वारक-यांची केश कार्यालय सेवा करण्यात आली. यावेळी लक्ष्मण राऊत, सुरेश माने, नितीन झांबरे, बालाजी सम्रत, वैजनाथ राऊत, ओंकार राऊत, गजानन राऊत,प्रेम राऊत,हरी झांबरे,काका राऊत, ओंकार सूर्यवंशी,दिपक सूर्यवंशी,किरण झांबरे,काका सुरवसे, धनंजय सूर्यवंशी,यश जाधव,जनकराज जगदाळे, प्रशांत सूर्यवंशी, श्रीकांत सूर्यवंशी, उमाकांत सम्रत, सोमनाथ यादव, संदिप राऊत,रामा राऊत, गौरव कचरे, चंद्रकांत घोडके,भारत कचरे, बबलू राऊत आदीनी वारक-यांची सेवा केली. श्री गजानन महाराज यांच्या पालखीतील वारक-यांची मसाज सेवा तेर येथील विशाल पांचाळ यांनी केली. श्री गजानन महाराज यांची पालखी तेर येथे येत असल्याने पालखी मार्गावर महिलांनी उत्कृष्ट प्रकारे रांगोळी काढून सजावट केली होती. अनेक ठिकाणी रांगोळीभोवती फुलांची सजावट करण्यात आली होती.

