धाराशिव (प्रतिनिधी)- प्राचार्या शुभांगी गावडे यांनी शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असे प्रतिपादन प्राचार्य डॉ ए.के मंजुळकर यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे, संस्थेच्या माजी सचिवा प्राचार्या शुभांगी गावडे यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ ए.के मंजुळकर बोलत होते.
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या मुख्य प्रवाहातील, शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या मायेच्या कुशीत, संस्कारात वाढलेले एक व्यक्तिमत्त्व म्हणजे ज्ञानज्योती शुभांगी गावडे, कुठल्याही प्रकाराचा गर्व न बाळगता,भिती न बाळगता एक स्त्री म्हणून त्यांनी केलेले शैक्षणिक कार्य नव्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. सदर प्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने कार्यक्रमाधिकारी डॉ नवले, डॉ मारुती लोंढे यांच्या पुढाकाराने वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा माधव उगिले यांनी केले. तर आभार प्रा विवेकानंद चव्हाण यांनी मानले.
