परंडा (प्रतिनिधी)- कल्याणसागर समूहातील कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचे सहशिक्षक महादेव नरुटे व सिद्धेश्वर विद्यालय देवगाव चे मुख्याध्यापक निर्मलकुमार गांधले यांचा नियत वयोमानानुसार सेवा पूर्तीचा कार्यक्रम विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या आनंदी वातावरणात संपन्न झाला. याचवेळी चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उज्वल यश प्राप्त केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संस्थापक अध्यक्ष माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या शुभहस्ते पार पडला. 

कार्यक्रमाचे अध्यक्ष ठाकूर यांनी नरुटे सर व गांधले सर यांचा सपत्नीक सत्कार करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी संस्थापक अध्यक्ष म्हणून जी माझी जबाबदारी आहे ती चोखपणे पार पडली असून माझ्या आजी-माजी विद्यार्थ्यांना व त्यांच्या पालकांना भविष्यात कोणतीही शैक्षणिक सामाजिक आर्थिक अडचण आल्यास ती  तात्काळ दूर करण्याचे आश्वासन याप्रसंगी त्यांनी दिले. उच्च पदावर असणारे अनेक विद्यार्थी आपल्या संपर्कात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.आपल्या गुरुजनांबद्दल आजी-माजी विद्यार्थ्यांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमास मुख्याध्यापक काशीद सर, पडघन सर, पवार सर, ठाकूर सर, गरड सर, गोरे सर, रहमत शेख सर, चामवड सर, शेरे सर तसेच मोठ्या संख्येने आजी  माजी विद्यार्थी व सरांचे नातेवाईक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नीट परीक्षेत  656 गुण घेऊन उत्तीर्ण झालेला उत्कर्ष कोठावळे याने विद्यार्थ्यांना आपल्यातील उणिवा ओळखून त्यावर मात करून आपल्या ध्येय पर्यंत आपल्याला कसे जाता येते याचे उदाहरण देत विचार व्यक्त केले . सेवापुर्तीच्या निमित्ताने सत्कारमूर्ती नरुटे व गांधले सर यांनी आपले अनुभव कथन करून सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन सचिन शिंदे प्रास्ताविक मुकुंद भोसले यांनी केले तर आभार गणेश पवार यांनी मानले.


 
Top