मुरुम (प्रतिनिधी)- श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालय उमरगा येथील एनसीसी विभागाचा निकाल जाहिर झाला.शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये बी आणि सी प्रमाणपत्र परीक्षा 53 महाराष्ट्र बटालियन लातूर यांच्या अंतर्गत घेण्यात आली यामध्ये बी प्रमाणपत्राच्या परीक्षेमध्ये एकुण 20 मुले आणि मुली उतीर्ण व सी प्रमाणपत्र परीक्षेत 03 कॅडेटस उतीर्ण झाले प्रत्येक वर्ष्या प्रमाणे एनसीसी विभागाने ही यशाची परंपरा कायम राखली.यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले सरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन कॅडेटसचा गौरव करण्यात आला.या प्रसंगी कॅडेटसना मार्गदर्शन करताना त्यांनी कॅडेटसना पोलीस,सैन्यदलात भरती झाल्यानंतर देशसेवा, समाजसेवा करावीच पण एक सामाजिक बांधिलकी म्हणून सर्वांना सोबत घेऊन ग्रामीण भागातील तळागाळातील,गरीब,पीडित, वंचित विद्यार्थ्यांना एनसीसी चे उद्देश,महत्व सांगावे जेणेकरून यापुढेही एनसीसी विभागाचे , महाविद्यालयाचे नाव लौकिक वाढेल असे आव्हान त्यांनी केले.या कार्यक्रमास मंचावर डॉ पद्माकर पिटले,कॅप्टन डॉ ज्ञानेश्वर चिट्टमपल्ले, डॉ चंद्रसेन करे, डॉ राम जाधव सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.या यशा बदल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अमोल मोरे उपाध्यक्ष श्री अश्लेष मोरे सर्व संचालक मंडळ यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
