मुरुम (प्रतिनिधी)- मुरूम येथील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात दि. 16 जुलै 2026 रोजी बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये महाविद्यालयातून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा तसेच इयत्ता अकरावीमध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समितीचे अध्यक्ष त्र्यंबकराव इंगोले होते. यावेळी भारत शिक्षण संस्थेचे संचालक रामभाऊ इंगोले, प्रमुख मार्गदर्शक डॉ. सुवर्णा पाटील, माजी प्राचार्य डी. टी. इंगोले तसेच कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. गोविंद इंगोले यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच अकरावीमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शैक्षणिक जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण, नियमित अभ्यास, शिस्त आणि उच्च ध्येय ठेवून यश संपादन करण्याचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
