धाराशिव  (प्रतिनिधी)-  दिव्यांग व्यक्तींना नवीन वाहन खरेदी करताना महाराष्ट्र मोटार वाहन कर अधिनियम 1958 अंतर्गत आरटीओ करमाफीचा लाभ मिळणार आहे. शासनाच्या 27 जुलै 2021 च्या अधिसूचनेनुसार आणि गृहमंत्रालय व अवघड उद्योग मंत्रालयाच्या निर्देशांनुसार हा लाभ देण्यात येणार आहे.

करमाफीचे निकष पुढील प्रमाणे आहे.10 लाखांपर्यंतच्या वाहनांसाठी  100 टक्के करमाफी.10 ते 20 लाखांच्या वाहनांसाठी  75 टक्के करमाफी तर वाहनाची किंमत 20 लाखांपेक्षा अधिक असेल तर 50 टक्के करमाफी परंतू अशी सूट अशा व्यक्तीच्या नावाने नोंदणी केलेल्या प्रत्येक प्रवर्गातील केवळ एकाच वाहनासाठी वैध असेल.

महत्वाची अट म्हणजे दिव्यांग व्यक्तीच्या नावावर फक्त एकाच वाहनासाठी ही सवलत लागू राहील.दिव्यांग व्यक्तींना वाहन खरेदी करताना आवश्यक सहकार्य व विविध सोयी-सुविधा पुरवाव्यात,याबाबत वाहन विक्रेत्यांना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. दिव्यांग व्यक्तींना वाहन खरेदीदरम्यान कोणतीही अडचण आल्यास,त्यांनी तात्काळ आरटीओ कार्यालयाशी संपर्क साधावा,असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हर्षल डाके यांनी केले आहे.


 
Top