भूम (प्रतिनिधी)-  तालुक्यातील राळेसांगवी गावचे सुपुत्र रमेश वसंतराव टाळके यांची भारतीय तटरक्षक दलात कमांडंट पदावरून उपमहानिरीक्षक पदी पदोन्नती झाली आहे. सध्या ते पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे कार्यरत आहेत.

रमेश टाळके यांनी आपल्या सेवाकाळात अनेक धाडसी व उल्लेखनीय कारवाया यशस्वीपणे पार पाडल्या असून, त्यांच्या शौर्याबद्दल त्यांना अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.  यापूर्वी त्यांनी दिव-दमन, ओडिशा, केरळ, तामिळनाडू अशा विविध राज्यांमध्ये तसेच परदेशातही देशसेवा बजावली आहे. कर्तव्यदक्ष, शिस्तप्रिय आणि धाडसी अधिकारी म्हणून तटरक्षक दलात त्यांची विशेष ओळख आहे. राळेसांगवीसारख्या ग्रामीण भागातून येऊन त्यांनी देशसेवेत मिळवलेले हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्यांच्या या पदोन्नतीबद्दल भूम तालुक्यातून व ऑफिसर्स क्लब राळेसांवी तसेच समस्त ग्रामस्त राळेसांगवी यांचे कडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


 
Top