भूम (प्रतिनिधी)- भूम शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 106 व्या जयंती निमित्त आयोजनाची बैठक साठेनगर येथील समाजमंदिरात लक्ष्मण साठे यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाली . या वेळेस मोठ्या उत्साहात जयंती साजरी होणार आहे. या जयंतीनिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तसेच सामाजिक विषयावर व्याख्यान, वृक्षरोपण, रक्तदान शिबीर, गरीब कुटुंबातील व्यक्तीना धान्य वाटप व अन्नदान, गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व ड्रेस वाटप अशा विविध सामाजिक उपक्रमाने ही जयंती साजरी होणार आहे. बैठकीमध्ये सर्वानुमते अध्यक्षपदी प्रदीप अनंत साठे, उपाध्यक्षपदी नितीन पांडुरंग साठे, कोषाध्यक्षपदी सचिन महादेव साठे सचिवपदी विशाल विलास शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली या बैठकीस आकाश साठे, कुणाल साठे, ओंम साठे, उमेश साठे, दत्ता साठे, बालाजी साठे, निलेश साठे, सुजित साठे, राम साठे, गणेश गायकवाड, सुमित साठे, साहिल साठे, यश चव्हाण, अभिजित साठे, कुणाल आडागळे, संतोष जाधव आदि समाजबांधव उपस्थित होते.
