परंडा, (प्रतिनिधी)- हिंदु धर्मियांतील महत्वाचा असणारा सण वटसाविञी पोर्णिमेनिमित्त,वटवृक्षाची मनोभावे पुजाअर्चा करुन पतीसाठी दिर्घायुष्याची कामना करीत सोमवार ता.29 रोजी  सण साजरा करीत महिलांनी जन्मजन्मांतरीच्या गाठी दृढ केल्या.दुपारी 1 वाजता महिलावर्ग साजश्रंगार करीत पुजेसाठी शहर परिसरातील वटवृक्षाची ठिकाणे महिलांवर्गामुळे  फुलुन गेली होती.

हिंदुधर्मियांमध्ये वटसाविञी पोर्णिमा सणाला अनन्यसाधारण महत्व आहे.इतिहासकालीन साविञी सत्यावानाच्या धार्मिक कथापुराणाने समाजात रुढीपरपंरेनुसार चालत आलेला हा सण महिलांच्या जिवाळ्याचा सण मानला जातो.त्यामुळे या दिवशी महिला,नववधु मोठ्या भक्तिभावाने वटवृक्षाची मनोभावे पुजा करतात.या सणानिमित्त महिला व्रतस्थ,उपहास करतात.सोमवारी वटपोर्णिमा साजरी करण्यासाठी घराघरातील सौभाग्यवती महिलांनी मोठा साजश्रंगार करुन वडाच्या पुजेसाठी जाताना दिसुन येत होत्या.शहरातील ऐतिहासिक बालाजी मठाजवळील असलेल्या वडाभोवती,कल्याणसागर शाळेलगत मोठ्या वडाच्या वृक्षाभोवती तसेच ज्या ज्या ठिकाणी वडाचे झाड आहे अशा ठिकाणी महिलांनी पुजाअर्चा केली. वटपोर्णिमेनिमित्त घरोघरी पुरण-पोळीचा नैवेद्य करण्यात आला होता.वटसाविञी सणासाठी नवविवाहीतांनी,महिलांनी वडपुजेसाठी फेरे घेण्यासाठी सुती दोरा,हळदी कुंकू,आंबे,हिरव्या बांगड्या व ओटीच्या साहित्याची खरेदी केली होती.सुवासिनी महिलांनी वडाच्या झाडाची पुजा करुन झाडाला दो-याचे गठबंधन बांधीत सात फेरे घेतले.या सणानिमित्त सौभाग्यवती महिलावर्गानी एकमेकींना कुंकूम लावत औक्षण केले.बाजारात गावरान आंबे नसल्याने नागरीक निलम, केसर जातीच्या आंबेखरेदीला पसंती देत होते.दररोज दहा रुपयाला मिळणारा वितभर मोगऱ्याचा गजरा वटपोर्णिमेनिमित्त पंचवीस ते तीस रुपयाला विकला जात होता.या सणानिमित्त शहरातील भवानी शंकर मंदीर,नवीन राम मंदीरात,विठ्ठल मंदीरात दर्शनासाठी महिलांनी गर्दी केली होती. मोठ्या आनंद उत्साहात वटपोर्णिमा सण साजरा करण्यात आला.

 
Top