धाराशिव (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा हा तुळजाभवानीचा जिल्हा आहे. काही नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मोघलांशी टक्कर दिली. त्या काळात शिवाजी महाराज जर निधीसाठी औरंगजेबकडे गेले असते तर आपण राहिलो असतो का ? असा सवाल शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे यांनी करून निधीसाठी गद्दारी करणाऱ्या सहा खासदारांवर कडाडून टिका धाराशिवमधील शिवसैनिकांच्या मेळाव्या रविवार दि. 28 जून रोजी केली. 

पुढे बोलताना उध्दव ठाकरे यांनी अतिवृष्टीमधील व निवडणुकीच्या काळात आपण धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलो होतो. मोठ्या अभिमानाने आपण आमदार कैलास पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर हे खरे शिवसेनेचे वाघ असल्याचे सांगितले होते. परंतु ओमराजे यांच्या गद्दारीने वाघाचे कातडे पांघरूण लांडगा होता हे माहिती नव्हते. असे सांगून ठाकरे यांनी धाराशिव शहरात 500 कोटीचे प्लॉट असल्याची माहिती झाल्यामुळे ईडीची चौकशी ओमराजे यांच्या पतसंस्थेच्या मागे लागली होती. म्हणून त्याने गद्दारी केली. लोकसभा निवडणुकीच्यावेळेस भूम तालुक्यातील पाटसांगवी येथील समाधान पाटील यांची मतदानादिवशी विरोधकांनी हत्या केली. त्याची चौकशी सुध्दा ओम याने न करता गद्दारीकरून शिवसेनेकांची हत्या करणाऱ्या गद्दाराच्या गटात जावून बसला. पण आपण समाधान पाटील यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नसल्याचेही ठाकरे यांनी सांगितले. 

यावेळी खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अरविंद सावंत, आमदार आदित्य ठाकरे, आमदार कैलास पाटील, आमदार प्रविण स्वामी, चंद्रकांत खैरे, अंबादास दानवे, शंकरराव बोरकर, माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर आदीसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते. 


भाजपापेक्षा गद्दाऱ्यांच्या खासदारांची संख्या जास्त

यावेळी उध्दव ठाकरे यांनी पुढील काही दिवसात विचित्र राजकारण होणार आहे. असे सांगून पंतप्रधानाच्या शर्तीत असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, शिवराज चौहाण यांच्या मागे चौकशी लावली. तर आता पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये असलेले देवेंद्र फडणवीस यांचा कमीपणा दाखविण्यासाठी सहा खासदारांना भाजपमध्ये न घेता गद्दार गटात घेतले. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे वर्चश्व कमी करण्याचा डाव आहे असे सांगितले. महाराष्ट्रातील भाजपपेक्षा गद्दार गटाचे खासदार संख्या जास्त आहे. असे सांगून उध्दव ठाकरे यांनी अनेकदा शिवसेना फोडून शिवसेना संपविण्यांचा प्रयत्न केला गेला. परंतु हिंदूह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावर असलेले जनतेचे प्रेम त्यामुळे शिवसेना कधीही संपणार नाही. धाराशिवच्या खासदारासाठी आपण मते मागण्यासाठी आलो होतो. परंतु त्यावेळ आपल्याला गद्दाराचे खरे स्वरूप माहित नव्हते असे सांगून ठाकरे यांनी मला माफ करा असे सांगितले. 


ओमराजे सोगांड्या- संजय राऊत

खासदार संजय राऊत यांनी ओमराजे निंबाळकर यांच्यावर टिका करताना ओमराजे सोगांड्या असल्याचे सांगून स्वतःचा भाव वाढविण्यासाठी ते उशिरा गद्दारात सामिल झाल्याचे सांगितले. 




 
Top