धाराशिव (प्रतिनिधी)- आरोग्य विभागातील विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये तसेच इतर शासकीय आरोग्य संस्थांमध्ये यशस्वी कंपनीमार्फत कार्यरत असलेल्या कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर यांनी आमदार रोहित पवार यांना निवेदन देऊन त्यांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले आहे.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, डेटा एन्ट्री ऑपरेटर हे आरोग्य विभागातील विविध ऑनलाइन पोर्टलवरील माहिती भरणे, रुग्णांची नोंद अद्ययावत ठेवणे, विविध योजनांचे ऑनलाइन कामकाज, दैनंदिन व मासिक अहवाल तयार करणे यासह आरोग्य यंत्रणेचे महत्त्वाचे काम सातत्याने पार पाडत आहेत. मात्र, अत्यल्प मानधन, मागील चार ते पाच महिन्यांपासून प्रलंबित वेतन आणि 12 महिने पूर्ण झाल्यानंतर सेवा समाप्त करण्याची पद्धत यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आ

कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागातील सर्व कंत्राटी डेटा एन्ट्री ऑपरेटर यांचा राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये समावेश करावा, प्रलंबित मानधन तात्काळ अदा करावे, नोकरीची शाश्वती द्यावी, कामाच्या स्वरूपानुसार योग्य मानधन निश्चित करावे तसेच अनेक वर्षांपासून सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी केली आहे. या सर्व प्रश्नांवर आगामी अधिवेशनात शासनाचे लक्ष वेधून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी विनंतीही आमदार रोहित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

 
Top