धाराशिव (प्रतिनिधी)-मागच्या 2022 च्या गद्दारीवेळी कैलासच्याही पायी संपत्तीची रास पडली होती तरी देखील त्याने ते सगळं लाथाडून शिवसेनेशी इमान राखत शिवसैनिक कसा असावा हे दाखवून दिल असे गौरवोद्गार उद्धव ठाकरे यांनी आमदार कैलास पाटील यांच्या बद्दल काढले. 

यावेळी ठाकरे म्हणाले की, 2022 च्या गद्दारी वेळी गाड्यांमधून आमदार घेऊन जात होते त्यावेळी कैलास ने मला फोन करून या सर्व गोष्टी सांगितल्या होत्या. तेव्हा कैलास सुरतच्या बॉर्डरवरून गाडीतून उडी टाकून पायी चालत आला. स्वतः मुख्यमंत्री होतो नंतर त्याची आणायची व्यवस्था केली. तेव्हाही कैलासच्या पायाशी संपत्तीची रास व खोक्यांचे अमिष होतेच, पण ते सगळंच त्यानं लाथडले हाच खरा शिवसैनिक असल्याचे ठाकरे यांनी म्हटले. 

खासदार संजय राऊत यांनीही कैलास पाटील यांच्या निष्ठेबद्दल समाधान व्यक्त केले. 

आमदार कैलास पाटील म्हणाले की, निष्ठा ती बोलून दाखवायची गोष्ट नाही तर ते कृतीतून दाखवावं लागतं. उद्धव साहेब यांची साथ कधीही सोडणार नाही असा शब्द त्यांनी ठाकरे यांना दिला तसेच शिवसैनिकांना बोलताना त्यांनी कधीही कसलीही वेळ आली तरी शिवसैनिकांनाही मी वाऱ्यावर सोडणार नाही अस वचन आमदार पाटील यांनी यावेळी दिले.


Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top