परंडा (प्रतिनिधी)- श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालय, परंडा येथे महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार महाराष्ट्राचे कै.उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम पार पडला.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने यांच्या अध्यक्षतेखाली सांस्कृतिक विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी मराठी विभागप्रमुख डॉ.गजेंद्र रंदिल व कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ.किरण देशमुख यांच्या हस्ते अजितदादा पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी अजितदादा पवार यांच्या जीवनकार्य व नेतृत्वावर मार्गदर्शन केले. आपल्या व्याख्यानात त्यांनी अजितदादा पवार यांच्या स्पष्टवक्तेपणा,परखड नेतृत्व, विकासाभिमुख दृष्टीकोन आणि लोकहिताच्या कार्याचा आढावा घेतला. समाजकारण व राजकारणात कार्य करताना त्यांनी विविध महापुरुषांच्या विचारांचा स्वीकार करून लोककल्याणाला प्राधान्य दिले. त्यांचे कार्य व नेतृत्व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी असून त्यांच्या सामाजिक व राजकीय विचारांचे अनुकरण करण्याची गरज असल्याचे मत डॉ. चंदनशिवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.महेशकुमार माने, कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक डॉ.किरण देशमुख, प्रशासकीय अधिकारी भाऊसाहेब दिवाने, कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पद्मा शिंदे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top