धाराशिव (प्रतिनिधी)-  रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असुन रुग्णसेवेसारखे दुसरे सुख कशात नाही, रुग्णसेवेसाठी तेरणाच्या माध्यमातून 15 ते 18 कोटी रुपये तरतूद यावर्षी ठेवली आहे. किडनी ट्रान्सप्लॅन्ट परवानगी मिळाल्या नंतर कळंब येथील एका लहान बालकाचे 56 लाखांचे ऑपरेशन केले. रुग्ण सेवा केल्यासारखे दुसरे सुख कशात नाही. नियमित आरोग्य शिबीर घेण्याचा संकल्प व मनोदय मल्हार राणाजगजीतसिंह पाटील यांनी महाआरोग्य शिबीर उदघाट वेळी व्यक्त केला. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबीर घेण्यात आले.

आरोग्य शिबीर हा चांगला संकल्प असुन याचा फायदा लोकांना होणार आहे. तेरणा जनसेवाच्या माध्यमातून कॅम्प सुरु असुन तेरणा माध्यमातून 2 लाख लोकांवर उपचार केल्याचे सांगितले. जनसेवेचे व रुग्णसेवेचे हे कार्य भाजपच्या माध्यमातून अविरत काम करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी म्हणाले. 

यावेळी व्यासपिठावर नगराध्यक्षा नेहा काकडे, राहुल काकडे, सतीश दंडनाईक, मराठवाडा संयोजक नितीन काळे, अनिल काळे, संपत डोके, जिल्हा परिषद सदस्य प्रदीप शिंदे, प्रवक्ते ॲड. नितीन भोसले, उप नगराध्यक्ष अक्षय ढोबळे, सभापती प्रवीण माळी, ऍड खंडेराव चौरे, जिल्हा शल्य चिकित्सक धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरदास, कुलदीप मिटकरी, वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन शैलेंद्र चव्हाण उपस्थितीत होते. 

यावेळी मल्हार पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी रक्तदान केले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, तेरणा वैद्यकीय महाविद्यालय नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने भाजप धाराशिव यांच्या समनव्यातुन धाराशिव येथे महाआरोग्य शिबीराचे उदघाटन करण्यात आले. माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे शिबीर आयोजित केले. 

औषध वितरण, आयुष विभाग, रक्त तपासणी, दंत रोग, शल्य चिकित्सा, कान नाक घसा, मनोविकार, नेत्र रोग, बाल रोग, त्वचा रोग, अस्थीरोग, स्त्री रोग, फिजिओथेरपी, ईसीजी, आयुष्यमान भारत, आयुष, औषध वितरण असे अनेक विभाग कार्यरत होते. शिबिरामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांकडून विविध आजारांची तपासणी, सल्ला व आवश्यक उपचार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. गंभीर आजाराचे लक्षण असलेल्या गरजू रुग्णांवर पुढील उपचार आपल्या तेरणा हॉस्पिटल, नेरुळ येथे मोफत करण्यात येतील.



प्रत्येक गावात एक बाग करण्यात येणार असुन खुली व बांधिस्त जीम व्यायामशाळा सुरु करण्यात येणार आहे. अंगणवाडीमध्ये टीव्ही व सोलर बसवले जाईल व जुन्या ठिकाणी पण बसविले जाणार आहेत. महिलांना अंगणवाडी येथे पोषण आहार देण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने त्यांना दिल्या जाणाऱ्या निधीतून 1 सफाई कर्मचारी लावायचा असुन स्वच्छता व अभियासिका याची देखरेख करायची आहे. 

मनी बँक सुरु करण्यात येणार असुन शाळेत ही सुरु असेल. एमसीक्यू प्रश्न व उत्तर प्रतिका दिली जाणार असुन त्यांना मार्गदर्शन, परीक्षा घेतल्या जातील. अभ्यास सोबत एक कला यावी यासाठी प्रोत्साहन देणे, शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी मुलांना शेतात नेहून काम करणे, पेरणी असे शिकवले जाणार आहे. जनावरासाठी पाणवठे सुरु केले जाणार आहेत. तालुका व जिल्हा स्तरावर गावांना पुरस्कार दिले जाणार आहेत. डिसेंबरमध्ये बाल साहित्य संमेलन केले जाणार असुन त्यासाठी 50 लाखांचा निधी ठेवला आहे.

Next
This is the most recent post.
Previous
Older Post
 
Top