धाराशिव (प्रतिनिधी)-  बदलते हवामान,कधी अतिवृष्टी तर कधी पावसाचा खंड... अशा अनिश्चित परिस्थितीतही सोयाबीनचे उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आणि शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी रुंद सरी-वरंबा तंत्रज्ञान हा सर्वोत्तम पर्याय असल्याचा संदेश जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी आज प्रत्यक्ष शेतात उतरून दिला.धाराशिव तालुक्यातील रुईभर येथील प्रगतिशील शेतकरी किरण तीर्थकर यांच्या शेतात श्री.पुजार यांनी स्वतः बीबीएफ पेरणी यंत्र चालवत सोयाबीन पेरणीचे प्रात्यक्षिक केले.तर टोकण पद्धतीने तूर लागवड करून आधुनिक आणि शास्त्रशुद्ध शेतीची दिशा शेतकऱ्यांसमोर उभी केली.

खरीप हंगाम 2026-27 च्या पार्श्वभूमीवर आयोजित या प्रात्यक्षिकाला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद साधत,“जमिनीत पुरेसा ओलावा उपलब्ध असल्याने वेळेत पेरणी पूर्ण करा. मात्र पारंपरिक सपाट पद्धतीऐवजी बीबीएफ पद्धतीचाच अवलंब करा,असे आवाहन केले. कार्यक्रमाला प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महादेव आसलकर,तालुका कृषी अधिकारी राहुल दिवाने,सरपंच भगीरथ लोमटे, मंडळ कृषी अधिकारी सोनाली गादेकर,उप कृषी अधिकारी वैभव लेणेकर,सहाय्यक कृषी अधिकारी सचिन सोनवणे यांच्यासह कृषी विभागाचे अधिकारी,क्षेत्रीय कर्मचारी,ग्रामस्थ आणि परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

बीबीएफ प्रात्यक्षिकासाठी जिजाऊ सेंद्रिय गटाचे सुरज जाधव, बालाजी धुमाळ, हनुमंत लोमटे,जगन भोसले, भीमराव भोसले,सोपान निंबाळकर, कृष्णा बिराजदार,राहुल भोईटेआशा धुमाळ,पल्लवी जाधव,मंगला वडवले,दीपा बिराजदार,मनीषा लोमटे,रतन पवार,वैशाली माळी, ताराबाई शिंदे तसेच गौडगाव येथील पाणी फाउंडेशनच्या महिला शेतकरी अर्चना भोसले,सिंधू भोसले,पार्वती भोसले,शिलावती भोसले,वर्षा भोसले,विमल माळी,शारदा भोसले यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.

 
Top