तुळजापूर (प्रतिनिधी)- हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील डॉ. सौरभ माणिकराव मसारे यांनी कै. प्रभाकर मसारे (आजोबा) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिनांक 03 जुलै 2026 रोजी श्री तुळजाभवानी देवींच्या चरणी सुमारे 1006.730 ग्रॅम वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केला.

डॉ. मसारे यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेऊन देवीच्या चरणी हा मुकुट भक्तिभावाने अर्पण केला. श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानने सदर देणगी अधिकृतरीत्या स्वीकारून तिची नोंद केली. यावेळी विश्वस्त तथा तहसीलदार अरविंद गोळंगे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र  तामोरे प्रशासकीय अधिकारी माया माने उपस्थित होते.

 
Top