धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयामधील फार्मसी विभागाची विद्यार्थिनी सायली साळुंखे हिच्या अभिनव नाविन्यपूर्ण प्रकल्पाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे यांच्या इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड इनटर्नप्रेन्युअरशिप प्रोग्रामसाठी साठी निवड झाली आहे.
प्रकल्प सादरीकरण व मूल्यमापन प्रक्रियेदरम्यान सायली साळुंखे यांनी आपल्या कल्पनेचे प्रभावी सादरीकरण केले. त्यांच्या प्रकल्पातील नावीन्य, उपयुक्तता आणि उद्योजकतेसाठी असलेली क्षमता लक्षात घेऊन त्यांची या उद्योजकता प्रवासासाठी निवड करण्यात आली.
या निवडीमुळे सायली साळुंखे हिला डीबाटुच्या इन्क्युबेशन कार्यक्रमांतर्गत संरचित मार्गदर्शन तज्ज्ञांचे मेंटरिंग, उद्योग व संशोधन क्षेत्रातील नेटवर्किंग तसेच उद्योजकता परिसंस्थेशी जोडण्यासाठी आवश्यक सहकार्य मिळणार आहे. याशिवाय तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगदेखील त्यांच्या प्रकल्पाच्या पुढील वाटचालीसाठी आवश्यक ते सहकार्य करणार आहे.
सायली साळुंखेच्या या यशाबद्दल माझी गृहमंत्री तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, महाराष्ट्र शासनाच्या मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त बाळासाहेब वाघ,विश्वस्त मल्हार पाटील, संस्थेचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, सर्व विभागप्रमुख व विभागातील सर्व प्राध्यापकवृंदानी व आजी माझी विद्यार्थ्यांनी मनापासून अभिनंदन केले. महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. विक्रमसिंह माने, फार्मसी विभागातील प्राध्यापक, शिक्षकवृंद व सहविद्यार्थ्यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. सायलीच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या शैक्षणिक व उद्योजकीय उपक्रमांना नवी प्रेरणा मिळणार असून इतर विद्यार्थ्यांनाही नाविन्यपूर्ण संशोधन व उद्योजकतेकडे वाटचाल करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल असा विश्वास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विक्रमसिंह माने यांनी व्यक्त केला आहे.
