तुळजापूर (प्रतिनिधी)- श्री तुळजाभवानी मंदिरातील जीर्णोद्धार व विकासकामे निर्विघ्न आणि यशस्वीरीत्या पूर्ण व्हावीत. या पवित्र उद्देशाने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे आज गुरुपौर्णिमेपासून विशेष मंत्रपठण विधीचा शुभारंभ करण्यात आला.

या विधी अंतर्गत गणपती अथर्वशीर्ष पारायण, श्रीरुद्र जप आणि दुर्गा सप्तशती पारायण संपन्न होत आहेत. संपूर्ण जीर्णोद्धार व विकास कामे पूर्ण होईपर्यंत हे तिन्ही मंत्रपठण रोज सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत नियमितपणे चालू राहणार आहेत. आजच्या कार्यक्रमाची वेळ सकाळी 5:30 ते दुपारी 12:00 अशी होती.

या कार्यक्रमाला तहसीलदार तथा धार्मिक व्यवस्थापक माया माने, अमोल भोसले, रमेश वाले यांच्यासह विपीन शिंदे, अमर परमेश्वर, अनंत कोंडो उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यजमानपद तिन्ही मंडळांकडे देण्यात आले होते. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र विधीचा लाभ घेतला.

 
Top