तुळजापूर (प्रतिनिधी)- भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे राबविण्यात येत असलेल्या 'संघटन सृजन' अभियानाच्या अनुषंगाने राष्ट्रीय विद्यार्थी संघच्या धाराशिव जिल्ह्यातील विविध तालुका व शहराध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (AICC) चे नियुक्त निरीक्षक, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निरीक्षक तसेच धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष , जिल्हाध्यक्ष यांच्या शिफारशीनुसार या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या नियुक्त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि चे राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड यांची मान्यता आहे. नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांमध्ये भूम अमृता भागवत शिंदे, वाशी ओमकार उंदरे, धाराशिव शहर मनसूर मकबूल सय्यद, उमरगा योगेंद्र राजेंद्र माने, उमरगा शहर गणेश अनिल सूर्यवंशी, लोहारा अमित विरोधे, कळंब ऋषिकेश टकले, परंडा अजित अनिल जरांगे, परंडा शहर सय्यद शादाब राहीद आणि नळदुर्ग शहर रहमान शेख यांचा समावेश आहे.
नियुक्त पदाधिकाऱ्यांनी ची संघटनात्मक बांधणी अधिक सक्षम करण्यासाठी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रभावीपणे काम करण्यासाठी, महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावर संघटनाचा विस्तार करण्यासाठी तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारांचा विद्यार्थ्यांमध्ये प्रसार करण्यासाठी सक्रियपणे कार्य करावे, अशी अपेक्षा नियुक्तीपत्रात व्यक्त करण्यात आली आहे. नवीन कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून नियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस संघटना अधिक सक्षम व प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
