तुळजापूर (प्रतिनिधी)- दिल्लीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी व घटक पक्ष  यांनी तहसिल कार्यालयावर निर्देशने केले. सदर मागण्या मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा यावेळी  नेत्यांनी दिला 

महाविकास आघाडीने आपल्या निवेदनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर संसदेत तातडीने चर्चा घ्यावी आणि आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले एफआयआर व गुन्हे मागे घ्यावेत, अशा प्रमुख मागण्या केल्या आहेत. हे निवेदन राज्यपालांच्या नावे तहसीलदार अरविंद बोबडे यांच्यामार्फत सादर करण्यात आले.  या आंदोलनात काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष एड. अरविंद बेडगे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष जगन्नाथ गवळी, काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अमोल कुतवळ, पंचायत समितीत माजी सभापती शिवाजी गायकवाड, विकास तांबे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अशोक जाधव, शहराध्यक्ष अमर चोपदार, नगरसेवक आनंद जगताप, रणजीत इंगळे, सुधीर कदम, अर्जुन साळुंखे, श्रीकांत वाघे सह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top