भूम (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेच्या वतीने सोजर मुकबधीर शाळेमध्ये लोकनेते स्व. अजित दादा पवार यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते हनुमंत आप्पा पाटुळे, संस्थापक अध्यक्ष प्रदीप डोके, सचिव रियाज पठाण, प्रदेश उपाध्यक्ष आमोल शेळके, जिल्हा अध्यक्ष पांडुरंग मिसाळ, परंडा तालुका अध्यक्ष पांडुरंग मिसाळ, भूम तालुकाध्यक्ष हनुमंत बोराडे, मराठवाडा महिला अध्यक्षा मंगल शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष याशिन बादेला, भूम तालुका महिला अध्यक्षा सुषमा पाटील, कुशवर्ता यादव उपस्थित होते यावेळी महाराष्ट्र राज्य दिव्यांग संघटनेचे वतीने सोजर मुकबधीर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना अन्नदान भोजन देण्यात आले.
