तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर तालुक्यातील आलियाबाद येथे तेलंगणा राज्याचे विधानसभा उपाध्यक्ष डॉ रामचंद्र नायक यांनी सदिच्छा भेट दिली. गावअतंर्गत विकास कामांची पाहणी केली व माहिती घेतली. तसेच वाचनालयाला भेट देऊन एकंदरीत विकासात्मक कामाबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी आलियाबाद ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सहपत्निक भव्य सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण, सरपंच सुर्यकांत चव्हाण, उपसरपंच अमृता चव्हाण, माजी नायब तहसीलदार माणिकराव चव्हाण, हनुमंत नायक,नंदू तेजावत, डॉ.रमेश लोकावत, डॉ.गिरीधर, ओएसडी भगवान नायक, प्रमिला नायक, ज्योतीका चव्हाण, सुभाष नाईक, विनायक चव्हाण, पांडुरंग चव्हाण, शिवाजी चव्हाण, माणिक राठोड, महादेव राठोड, सिद्राम पवार, यशवंत राठोड, सुभाष चव्हाण, सुभाष राठोड, तानाजी राठोड, ग्रामपंचायत सदस्य कुमार राठोड, अमोल चव्हाण, सुनील चव्हाण, यांच्या सह ग्रामस्थ उपस्थित होते. या सत्कार सोहळ्याचे प्रास्ताविक प्राचार्य संतोष चव्हाण यांनी केले. तर आभार गणेश चव्हाण यांनी मानले.
