तुळजापूर (प्रतिनिधी)- अरण्य गोवर्धन मठात गुरू पोर्णिमा साजरी करण्यात आली. यावेळी अरण्य गोवर्धन मठाचे महंत व्यंकट अरण्य महाराज यांचा महंत इच्छागीरी महाराज यांचा हस्ते सन्मान करण्यात आला. शेवटी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. 

प्रारंभी महंत व्यंकट अरण्य गुरू शिवारण्य यांनी दत्त मुर्तीचे अभिषेक व पुजन केले. यानंतर सर्व देवता व गुरू शिष्य परंपरेतील सर्व गुरूंचा समाधीचे पुजन करण्यात आले. प्रथेप्रमाणे संपूर्ण समाजमंदिर वाड्याला प्रदक्षिणा करून कुंडाची पुजा करण्यात आली. यावेळी बाळकृष्ण अमृतराव, बापूसाहेब अमृतराव, शिवा अमृतराव, महेश अमृतराव, शितल अमृतराव, धनंजय अमृतराव, अतुल अमृतराव, अभिजित अमृतराव आदींची उपस्थिती होती. शेवटी महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. 


सोमवार गीरी मठात अन्नदान 

शहरातील सोमवार गीरी मठात गुरू पोर्णिमा साजरी करण्यात आली. प्रारंभी महंत इच्छागीरी महाराजांनी सर्व समाधीचे पुजन केले. यानंतर विधीवत पुजेनंतर अन्नदान महाप्रसादाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी शेकडो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी रुद्र पवार, चेतन शिंदे, जगदीश पलंगे, शहाजी जगदाळे आदींची उपस्थिती होती.

 
Top