धाराशिव (प्रतिनिधी)- शासनाच्या वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्ये विभाग व शासकीय आयुर्वेद महाविद्यालय यांच्या वतीने राज्याचे दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, बँक कॉलनी, स्नेहनगर येथे मंगळवार 28 जुलै रोजी महाआरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले.
महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. वीणा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पंचकर्म विभाग प्रमुख डॉ. सचिन टिके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित शिबिराचे उद्घाटन पत्रकार शितल वाघमारे, सलीम पठाण वसतिगृह अधीक्षक बारकुल यांच्या हस्ते झाले. शिबिरात डॉ. सचिन टिके आणि सहाय्यक प्राध्यापक डॉ. अतुल गोपनारायण यांनी सकाळी 9 ते दुपारपर्यंत एकूण 69 रुग्णांची तपासणी करून उपचार व विद्धाग्नी चिकित्सा केली. तसेच आहार, योग आणि पंचकर्माबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पंचकर्म विभागाच्या वतीने वसतिगृहाला प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक औषधांचे संच भेट देण्यात आले.
शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. प्रदीप भुसारी, डॉ. सोमेश वरके, आंतरवासीय विद्यार्थी डॉ. तेजस नवगिरे, अधिपरिचारक अजिंक्य गायकवाड, तसेच भालेराव, उकरंडे आणि तांबे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी गृहपाल राठोड, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
