धाराशिव (प्रतिनिधी)- गुरुपौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक व श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक कारखान्यांमध्ये हंगाम 2026-27 च्या मिल रोलर पूजनाचा विधीवत समारंभ संपन्न
देवकुरुळी येथे गुरुपौर्णिमेच्या पावन आणि शुभमुहूर्तावर श्री सिध्दीविनायक ॲग्रीटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, देवकुरुळी (युनिट क्र. 1) तसेच श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज लिमिटेड, खामसवाडी (युनिट क्र. 2) या दोन्ही कारखान्यांच्या हंगाम 2026-27 च्या मिल रोलर पूजनाचा विधीवत समारंभ श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ता कुलकर्णी यांच्या आई मीनाताई कुलकर्णी यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी दत्ता कुलकर्णी यांच्या पत्नी दिपाली कुलकर्णी, बालाजी कोरे, दिनेश कुलकर्णी, प्रतिक देवळे, गणेश कामटे, राजकुमार जाधव, अरविंद गोरे, मंगेश कुलकर्णी, प्रथमेश आवटे, विकास उबाळे यांच्यासह कारखान्यातील विभागप्रमुख, अधिकारी, कर्मचारी, ऊस वाहतूकदार तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन केले. शेतकरी हिताला सर्वोच्च प्राधान्य देत आधुनिक तंत्रज्ञान, कार्यक्षम व्यवस्थापन आणि गुणवत्तापूर्ण सेवांच्या बळावर आगामी गळीत हंगाम अधिक यशस्वी करण्याचा निर्धार याप्रसंगी व्यक्त करण्यात आला.