धाराशिव (प्रतिनिधी)- राज्यात दुधामध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होत असल्याने, या भेसळीमुळे दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला रास्त दर मिळत नाही.तसेच दुध भेसळीमुळे जनतेच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. राज्यातील जनतेला स्वच्छ व गुणवत्ता पुर्ण दुधाचा पुरवठा होण्याच्या दृष्टीने दुध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी कृषी,पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विकास विभागाने जिल्हास्तरीय समिती गठीत केलेली आहे.

जिल्हयातील दुध भेसळ रोखण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी,धाराशिव यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे.अप्पर जिल्हाधिकारी, धाराशिव तथा अध्यक्ष, जिल्हास्तरीय दुध भेसळ समिती, धाराशिव यांनी जिल्हयात दुध भेसळ रोखण्याकरीता पोलीस प्रशासन,जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त,अन्न व औषध प्रशासन, वैद्यमापन शास्र तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी यांनी समन्वय साधून संयुक्तीक कार्यवाही करुन दुध भेसळ रोखण्यासंदर्भात नियोजनबध्द व गोपनीयतेने कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

त्यानुसार जिल्हास्तरीय दूध भेसळ समिती,धाराशिव यांच्यामार्फत दिनांक 22 जुलै 2026 रोजी दुध भेसळ धडक मोहिमे अंतर्गत खालील प्रमाणे कारवाई करण्यांत आलेली आहे.

दिनांक 22 जुलै रोजी जिल्हयात धाराशिव तालुक्यातील डोडला डेअरी,शाखा वरुडा रोड,धाराशिव या केंद्रास दुध भेसळ धडक मोहिमे अंतर्गत भेट दिली असता प्रथम दर्शनी रेकॉर्ड प्रमाणे सकाळ व संध्याकाळ असे मिळून 12 हजार  लिटर दूध संकलन झाले असल्याचे आढळून आले आहे.तपासणीसाठी गाय दूधाचे 1 नमुना घेण्यांत आलेले आहे.धाराशिव तालुक्यातील शुअर सखी युनिक रियल इंटरप्रायजेस एम.आय. डी.सी.धाराशिव या केंद्रास दूध भेसळ धडक मोहिमे अंतर्गत भेट दिली असता सकाळ व संध्याकाळ असे मिळून गायीचे 2 हजार 600 लिटर व संध्याकाळचे म्हैस दूध 500 लिटर दूध संकलन असल्याचे आढळून आले आहे.तपासणीसाठी केंद्रावर संकलीत होत असलेल्या गायीच्या दूधाचे 1 नमुना घेण्यांत आलेले आहे,असे एकंदरीत एकूण 2 नमुने सहाय्यक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन,धाराशिव यांच्यामार्फत तपासणीसाठी घेण्यात येऊन,हे नमुने विश्लेषणासाठी /तपासणीसाठी प्रयोगशाळेत सहाय्यक आयुक्त (अन्न),अन्न व औषध प्रशासन, धाराशिव यांच्यामार्फत पाठविण्यांत आले आहेत.


 
Top