धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल तथा राज्यातील विद्यापीठांचे कुलपती श्री.जिष्णू देव वर्मा यांचे गुरुवार (दि. ३०) रोजी धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यानिमित्त तुळजापूर येथे आगमन झाले. शासकीय विश्रामगृहात पोहोचताच पोलिसांकडून त्यांना गार्ड ऑफ ऑनर देऊन स्वागत करण्यात आले.
राज्यपाल वर्मा यांचे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनीही पुष्पगुच्छ अर्पण करून त्यांचे स्वागत केले. यानंतर जिल्हाधिकारी पुजार यांनी शासकीय विश्रामगृहात राज्यपालांचा शाल,श्रीफळ, कवड्याची माळ,पुस्तक तसेच श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा देऊन सन्मानपूर्वक सत्कार केला.
या प्रसंगी राज्यपालांचे प्रधान सचिव डॉ.प्रशांत नारनवरे,श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे,निवासी उपजिल्हाधिकारी विद्याचरण कडवकर,अपर पोलीस अधीक्षक पांडकर,उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख,वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता संजय आडे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता भंडे उपस्थित होते.
