मुरूम (प्रतिनिधी)-   कंटेकुर, तालुका उमरगा येथे कांता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मंगळवारी (ता. 29) रोजी इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या बॅग व शालेय शिक्षणासाठी आवश्यक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले असून पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांनी ट्रस्टच्या कार्याचे मनापासून कौतुक केले.

 हा उपक्रम कांता चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक धनराज जाधव, सचिव नूपुर जाधव यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आला. शिक्षण हा समाजाच्या प्रगतीचा पाया आहे, या विचारातून विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. कार्यक्रमात प्रत्येक विद्यार्थ्याला शाळेची बॅग तसेच शालेय शिक्षणासाठी आवश्यक साहित्य मोफत वितरित करण्यात आले. साहित्य मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि उत्साह हा या उपक्रमाचे खरे यश ठरला.

 याप्रसंगी धनराज जाधव यांनी समाजसेवा ही केवळ मदत नसून समाजाप्रती असलेली जबाबदारी असल्याचे सांगितले. शिक्षण, आरोग्य, शेतकरी सहाय्य, युवकांना प्रोत्साहन तसेच विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे कार्य कांता चॅरिटेबल ट्रस्ट सातत्याने करत असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मोलाची मदत मिळाली असून समाजात शिक्षणाबाबत सकारात्मक संदेशही पोहोचला. उपस्थितांनी कांता चॅरिटेबल ट्रस्टच्या या सेवाभावी कार्याचे कौतुक करत भविष्यातही असे उपक्रम सातत्याने राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. 

यावेळी सरपंच विजयाबाई जमादार, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पटणे, जीवन सूर्यवंशी, चित्ररेखा दंडे, लक्ष्मीबाई शिकारे, लतिफ लदाफ, लक्ष्मण येवते, विजयकुमार कलशेट्टी, शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष राजश्री निंबर्गे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष कमलाकर पांचाळ, उपाध्यक्ष राम मुडगे, केंद्रप्रमुख बबिता महानुर, पोलीस पाटील लक्ष्मण पांचाळ, श्रीहरी पाटील, आशा सेविका लक्ष्मी घोडके, शकुंतला जमादार, महादेव बिराजदार, बालाजी जमादार, बालाजी जाधव, रसुल मुजावर, आप्पाराव पाटील, बसवेश्वर निंबर्गे, लक्ष्मण निंबर्गे, मुरळीचे माजी सरपंच इमरान पटेल, तंटामुक्ती समितीचे उपाध्यक्ष मुबारक मोजणीदार, मुस्ताक जमादार, इस्माईल पटेल, हसन मोजणीदार, राजेंद्र मुरलीकर, दीपक बिराजदार, बबलू पटेल, संभाजी कलबुर्गे, विश्वंभर सुरवसे, भरत जाधव, पुरुषोत्तम पिंपळे, पमू एकुरगे, शाम चौधरी, देवप्पा भाले, बबलू माने, दत्तात्रय प्रधाने तसेच शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top