धाराशिव (प्रतिनिधी)- ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हे 27 जुलै रोजी सोमवारी धाराशिव येथे येणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. 'आपला जीव धाराशिव' हे घोषवाक्य घेऊन अनेक योजना व कामे करण्यात येणार असुन त्यासाठी 'आपला जीव धाराशिव' यावर आधारित गाणे सुद्धा बनविले असल्याचे त्या म्हणाल्या.
जिल्हा परिषद, पंचायत समितीची नवीन इमारत, शासकीय अधिकारी, सभापती व सदस्य यांच्या निवासाची व्यवस्था केली जाणार असुन 240 कोटींचा डीपीआर सरकारकडे सादर केला आहे. नमो अभ्यासिका सुरु करण्यात येणार असुन स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले जाणार आहे. मुख्यमंत्री ग्राम समृद्ध योजना व जिल्हा परिषदेची माहिती घेणे, 710 गावे ग्रामसमृद्ध योजनेत सहभागी होणारआहेत. शालेय विद्यार्थ्यांना रात्री 7 ते 9 मोबाईल व टीव्ही वापर बंद करण्यासाठी भोंगा लावण्यात येणार आहे. हे 2 मुख्य कार्यक्रम असतील. शिक्षक, अधिकारी व इतराना एक गाव दत्तक दिले जाणार आहे. शाळा एकत्रिकरण केले जाणार असुन शाळेत सीसीटीव्ही बसवली जाणार असुन किमान 5 तरी सीसीटीव्ही बसवल्या जाणार आहेत. आशा व अंगणवाडी सेविकांना मोबाईल, इलेकट्रिक गाडी दिला जाणार आहेत.
प्लास्टिक बंदी व चहाचे कप बंद असतील जे वापरणार त्यांना 1 हजार व त्या ग्रामपंचायतील 10 हजार दंड लावणार असल्याचे त्या म्हणाल्या. प्रत्येक ग्रामपंचायतला वृक्ष लागवडीचे टार्गेट देण्यात येणार आहे. वृक्ष लागवड बरोबरच वृक्ष तोडीचे प्रमाण कमी करण्यासाठी 110 गावांना विद्युत शवदाहिनी देण्यात येणार असुन ती सौर ऊर्जेवर चालणार आहे. नावीन्य पुर्ण व सेस फंड वापरला जाणार आहे. असे त्यांनी सांगितले.
इलेक्ट्रिक घंटागाडीचे नियोजन असुन त्यासाठी 770 गाड्या लागणार आहेत. 83 अभ्यासिका सुरु करण्यात येणार असुन त्यात संगणक, पुस्तके, वायफाय व इतर सुविधा असणार आहेत. 5 वी ते 7 वी पर्यंत मुलींच्या शाळेत स्वच्छता गृह असणार आहे. 140 टॉयलेट बांधण्यात येणार आहेत. सांडपाणी प्रक्रिया करूनच नदीत सोडण्यात येणार आहे, जे कोणी याची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांचा 16 वित्त आयोग पैसे निधी दिली जाणार नाही अशी तंबी दिली.
जलजीवन मिशन योजनेत नळाला पाणी आले पाहिजे, तरच बील अदा केले जाईल, त्यासाठी अनेक बदल केले जाणार आहेत, असे त्या म्हणाल्या. जिल्हा परिषदेत पट संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले असुन गेल्या वर्षी 92 हजार पट होता यावर्षी 98 हजार होईल. वृक्ष लागवडची जबाबदारी ग्रामपंचायतला देण्यात येणार असुन मेरी पंचायत ऍपवर ते ऍड करून संगोपन सुद्धा केले जाणार आहे. जे वृक्ष संगोपन करणार नाहीत त्यांना निधी दिला जाणार नाही.
केंद्रीय विद्यालयासाठीची जागा निश्चित केली असुन बार्शी नाका परिसरात हे सुरु केले जाईल असे त्या म्हणाल्या. केंद्रीय विद्यालयात अनेक सुविधा असणार आहेत, काही जण श्रेय घेत आहेत. कोणी खोडा घातला नाही तर ते लवकर सुरु होईल. त्यांना तात्पुरती इमारत दिली जाणार आहे.
